मुंबई: ७ कोटी पीएफ(Provident Fund) खातेधारकांसाठी खुशखबर आली आहे. अर्थ मंत्रालयाने ८.२५ टक्के व्याजाला मंजुरी दिली आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये पीएफसंबंधित निर्णय घेणाऱ्या समिती सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने ८.२५ टक्के व्याजदराची घोषणा केली होती. आता मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
डेट आणि इक्विटीमधून झालेल्या कमाईच्या आधारावर ईपीएफओ व्याज दरांची समीक्षा केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीला सीबीटी व्याज दरांची शिफारस केली जाते. येथे हे व्याजदर ठरवले जातात यानंतर केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. दरम्यान, प्रत्येकवेळेला व्याजदर वाढवण्याची शिफारस केलीच हे गरजेचे नसते. ही शिफारस कोणतेही बदल न करण्याबाबत अथवा व्याज दर घटवण्याबाबतही असू शकते.
Attention EPF Members
The rate of interest for the Financial Year 2023-24 @ 8.25% for EPF members has been notified by the government in May of 2024. @LabourMinistry @mygovindia @MIB_India @PIB_India #EPFO #IntrestRate #EPFO #HumHainNaa #EPFOwithYou #ईपीएफओ
— EPFO (@socialepfo) July 11, 2024
ट्वीट करत दिली माहिती
ईपीएफओने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये लिहिले की ईपीएफ सदस्यांनी लक्ष द्यावे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ८.२५ टक्के व्याजदराला केंद्र सरकारकडून मे २०२४ पासून नोटिफाय केले आहे.