किती असेल टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीरचा पगार? राहुल द्रविडपेक्षा कमी पैसे मिळणार की जास्त

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवणारे कोच राहुल द्रविड यांचा करार या स्पर्धेसोबत संपला होता. त्यांच्याकडून हे ही स्पष्ट करण्यात आले होते की आता त्यांना कार्यकाळ वाढवून घ्यायचा नाही आहे.


भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर असतील अशी घोषणा मंगळवारी ९ जुलैला बीसीसीआयकडून करण्यात आली. आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न जरूर असेल की द्रविडची जागा घेणार्‍या धुरंधर क्रिकेटरचा पगार त्याच्यापेक्षा जास्त असेल का कमी?


मंगळवार भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे गंभीरची नियुक्ती केल्याची घोषणा मंगळवारी केली. दरम्यान, गंभीरची निवड केली जाणार असे अनुमान आधीपासूनच लावले जात होते. दरम्यान, गंभीरचा पगार अजून ठरणे बाकी आहे. मात्र माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्याइतकाच त्यांचा पगार असण्याची शक्यता आहे.


भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून वार्षिक १२ कोटी रूपये पगार दिला जात होता. गंभीरचाही पगार तितकाच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमसाठी जबाबदारी सांभाळणे अधिक महत्त्वाचे होते. पगार आणि इतर गोष्टींवर काम केले जाऊ शकते. २०१४मध्ये रवी शास्त्री यांनी पदभार सांभाळला होता तेव्हा त्यांचा करार करण्यात आला नव्हता. नंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गौतमच्या बाबतीतही काही बारीक बाबींवर काम केले जात आहे. त्याचा पगार राहुल द्रविड यांच्याइतकाच असेल.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात