मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकातून (Western railway Bhayandar station) दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. हरिश मेहता (Harsih Mehta) व जय मेहता (Jay Mehta) या पितापुत्रांनी थेट चालत्या लोकलसमोर येत ट्रॅकवर झोपून जीव दिला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेच्या पोलीस तपासादरम्यान आता एक वेगळीच बाब समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. हरिश मेहता आणि जय मेहता हे दोघे वसईतील वसंतनगरी परिसरात राहत होते. मंगळवारी त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हरिश आणि जय मेहता यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना घरात इंग्रजी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत, असे लिहिलेले आहे. त्यामुळे मेहता पितापुत्रांनी आत्महत्या केली की काही वेगळाच प्रकार आहे, या शक्यतेने पोलीस तपास करत आहेत.
सुरुवातीला मेहता पितापुत्रांना शेअर बाजारात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी नव्याने केलेल्या तपासात हरिश मेहता आणि जय मेहता यांनी कोणतेही कर्ज घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. मग मेहता पितापुत्रांनी नेमक्या कोणत्या दबावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांकडून सध्या मेहता बापलेकाच्या बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि मोबाईल रेकॉर्ड तपासले जात आहेत.
हरिश आणि जय मेहता हे दोघेही भाईंदर स्थानकातून रेल्वे ट्रॅकपर्यंत चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये बापलेक फलाटावरून चालत जात रेल्वे रुळांवर उतरल्याचे दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर हे दोघेही नायगावच्या दिशेने चालू लागले. त्यावेळी या दोघांना फास्ट ट्रॅकवरुन चर्चगेटला जाणारी ट्रेन येताना दिसली. या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये, यासाठी वडील आणि मुलगा दोघेही सुरुवातीला शेजारच्या ट्रॅकवरुन चालत राहिले. मात्र, चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर बापलेक अगदी मनाशी निर्धार केल्याप्रमाणे एकमेकांचा हात धरुन ट्रेनसमोर गेले आणि ट्रॅकवर झोपले. या दोघांनाही रेल्वे ट्रॅकवर झोपताना आपापलं डोकं रुळांवर ठेवलं होतं. त्यामुळे लोकल ट्रेन अंगावरुन गेल्यानंतर या दोघांच्या डोक्याचा भाग छिन्नविछिन्न झाला होता.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…