नवी दिल्ली: रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रियासा पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींना पुढील दौऱ्यासाठी खु्द्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी विशेष आमंत्रित केले आहे.
खरंतर, ऑक्टोबर महिन्यात रशियाच्या कजान शहरात ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेत सामील होण्यासाठी रशियाला जातील. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या हवाल्याने रशियाच्या वृत्तपत्र एजन्सीने सांगितले, नरेंद्र मोदी म्हणाले की ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निमंत्रण स्वीकारून खुश आहेत. तसेच ते ऑक्टोबरमध्ये कजानमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील.
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना ऑक्टोबरमध्ये रशियातील कजान शहरात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
६ नवे देश बनले आहेत ब्रिक्सचे सदस्य
या वर्षी रशिया ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारत आहे. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आह. तर सौदी अरेबिया, इराण, इथिओपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिरात हे नवे सदस्य आहेत.