Tuesday, April 22, 2025
HomeदेशVladimir Putin : राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केली मोठी घोषणा

Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केली मोठी घोषणा

रशियन सैन्यात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार

रशिया : दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सोमवारी संध्याकाळी मॉस्कोला (Moscow) पोहोचले. रशियाने (Russia) युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध सुरू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव (Denis Manturov) यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन लष्करात अडकलेल्या भारतीयांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याकडे उपस्थित केल्यानंतर रशियाने रशियन लष्करात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करून, त्यांना भारतात परतण्यास मदत करण्याचे मान्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन लष्करात अडकलेल्या भारतीयांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे उपस्थित केला. यांना रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करून, त्यांना भारतात परतण्यास मदत करण्याचे मान्य केले आहे. अनेक भारतीयांना फसवून रशियन सैन्यात भरती केल्याचे समोर आले आहे. रशिया-युक्रेन युद्धात डझनभर भारतीय रशियन सैन्यात अडकले असून अनेक भारतीय आघाडीवर तैनात आहेत. रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉस्कोमध्ये असलेले पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत डिनरमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. ज्यावर रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करून त्यांना भारतात परतण्यास मदत करण्याचे मान्य केले.

व्हायरल व्हीडिओमुळे धक्कादायक माहिती समोर

एजटांनी रशियात चांगल्या पगाराचे आमिष दाखवून, सुमारे दोन डझन भारतीयांना रशियामध्ये नेते. मात्र तेथे त्यांना लष्करात सामावून घेतले.

भारताने व्यक्त केला होता तीव्र आक्षेप

रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीयांचा व्हीडिओ समोर आल्यानंतर भारत सरकारने रशियासमोर हा मुद्दा उपस्थित केला. फसवणूक करून आणि खोटी आश्वासने देऊन भारतीयांना परदेशात पाठवणाऱ्या एजंटांवर कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले होते. भारतीय तपास यंत्रणांनी अशा एजंटांवर कारवाई केली आणि भारतीयांची तस्करी करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश केला. या एजंटांनी किमान ३५ भारतीयांना रशियात पाठवल्याचे तपासात उघड झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -