मुंबई : बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्याची नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सोमवारी विधानसभेत जोरदार मागणी केली. बेस्टच्या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर एकमेव चांगला पर्याय म्हणजे बेस्टचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण हाच एक उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, असा प्रस्ताव जर शासनाच्या विचाराधीन असेल, तर यावर जरूर विचार करण्यात येईल. मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी केली.
हिट अॅण्ड रन प्रकरणात महायुतीकडून तत्परतेने कारवाई
पुण्यात आणि वरळी येथे हिट अॅण्ड रनची प्रकरणे समोर आली. परंतु या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली. या उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात अभिनेत्री दिशा सालीयन, अभिनेता सुशांतसिंह यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न तत्कालिन सरकारने केला. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विरोधक कितीही आरोप करत असले तरी, हिट अॅण्ड रन प्रकरणात महायुती सरकारने केलेली तत्परतेची कारवाई निश्चित जनतेला दिलासा वाटणारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…