Tuesday, July 1, 2025

Crime : पालघरच्या ग्रामीण भागात हत्याच्या घटनांमध्ये वाढ

Crime : पालघरच्या ग्रामीण भागात  हत्याच्या घटनांमध्ये वाढ

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली आहे. दिवसागणिक हत्या, लूटमार व अपहरण, अशा घटना सतत वाढत आहेत. सोमवारी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही महिला वेडसर होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


दुसरी घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवरा बायकोच्या किरकोळ वादातून एका महिलेने आपल्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा तिला फिरायला घेऊन जात नाही, यावरून या नवरा बायकोमध्ये खटके उडत असत.


काल तिचा नवरा मित्रांसोबत पुन्हा फिरायला गेल्यामुळे तिचा संताप अनावर झाला व तिच्याकडून ही आततायी घटना घडली. या दोन्ही प्रकरणी मनोर व कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment