Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीPune International Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित होणार

Pune International Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित होणार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल (new terminal) सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

नवे टर्मिनल सुरू करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू होती.

याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की, ‘सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल होत असून नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. याची तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरू असून तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १४ जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असेल, असे मोहोळ म्हणाले.

पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री मोहोळ देणार!

नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -