Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीChhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! बसमध्ये जुंपली महिला कंडक्टर आणि प्रवाशांची मारामारी

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! बसमध्ये जुंपली महिला कंडक्टर आणि प्रवाशांची मारामारी

घटनेचा व्हिडीओ आला समोर

छत्रपती संभाजीनगर : मुंबई लोकलच्या (Mumbai Local) गर्दीमध्ये महिला प्रवाशांमध्ये होणारी बाचाबाची आणि मारामारी आता काही नवीन नाही. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) पाचोड बस स्थानकातून मात्र विचित्र घटना समोर आली आहे. थेट महिला कंडक्टरने एका पुरुष प्रवाशाला कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये मारामारी जुंपली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral) होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर रस्त्यावर पाचोड बस स्थानक आहे. हे बसस्थानक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाचं मानलं जातं. रोज या ठिकाणावरून दोनशे ते जवळपास अडीचशे प्रवासी ये-जा करतात. पाचोड बस स्थानकावर सर्वच बस थांबा घेतात. मात्र काही कंडक्टर मुजोरी करतात. पाचोड येथील काही विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी ‘आडूळ’ थांबा घेतला जात नाही. आजही असंच घडलं होतं.

अजय डुकळे या प्रवाशांने पाचोड येथून आडुळ वरती प्रवासी घेण्यास विनंती केली होती. परंतु महिला बस वाहकाने नकार दिला. त्यामुळे प्रवासी आणि बस कडंक्टरमध्ये बाचाबाची झाली. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. शाळेतील मुलींना बसमध्ये घेण्याची विनंती प्रवाशांनी केली होती. परंतु यास महिला कंडक्टरने नकार दिल्याने हा धक्कादायक प्रकार घडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)

पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

सुरूवातीला प्रवासी आणि कंडक्टर महिलेमध्ये शा‍ब्दिक वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या कंडक्टर महिलेने थेट प्रवाशाच्या कानशि‍लात लगावली. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या घटनेप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले आहेत. एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -