Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या निमंत्रणाने पंतप्रधान दोन दिवसाच्या रशियाच्या यात्रेवर पोहोचले आहेत. येथे पंतप्रधान रशियाच्या राष्ट्रपतींसोबत २२व्या रशिया-भारत वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील.


दोन्ही नेत्यांच्या दरम्यान अनौपचारिक बातचीत होण्याची शक्यता आहे. मॉस्को एअरपोर्टवर पंतप्रधानांचे रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांनी स्वागत केले. येथे त्यांचे भव्य स्वागत झाले. भव्य स्वागतानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रशियन कलाकारांनी डान्स केला. या दरम्यान रशियाचे उपपंतप्रधानही उपस्थित होते.


 


रशियाच्या मास्कोमध्ये रशियन कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये डान्स केला. पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले.



पाहा काय म्हणाले पंतप्रधान?


पंतप्रधान मोदींनी एक्सवर ट्वीट करत म्हटले की मॉस्कोमध्ये पोहोचलो आहे. आपल्या देशांदरम्यान विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त रणनितीक भागीदारी अधिक घट्ट होण्याची आशा आहे. खासकरून भविष्यात सहकार क्षेत्रात ही भागीदारी महत्त्वा. या दोन्ही देशांदरम्यानच्या मजबूत संबंधांमुळे आमच्या लोकांना खूप लाभ होईल.

Comments
Add Comment