Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला


कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि संजय राऊतांमध्ये स्पर्धा : नितेश राणे


मुंबई : 'देशामध्ये केंद्रात राहुल गांधी (Rahul Gandhi) नावाचा एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रात भांडुपमध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे. नेमकी कोणाची बुद्धी लहान आहे याबाबत यांची आपसांतच स्पर्धा लागली आहे', असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला. तसेच काल भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी गुजरातची गाडी वापरल्याबद्दल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या टीकेवर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नाव न घेता जोरदार टीका केली.


नितेश राणे म्हणाले, काल झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती. त्यामुळे लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या झोंबल्या. अन्य वेळी बोटं चाटून चाटून ढोकळे खायचे. यांच्या मालकाने अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि मग सकाळी उठून यांचा कामगार गुजरात्यांच्या नावाने खडी फोडणार. या भांडुपच्या बालबुद्धीला हे कळत नाही की आपल्या बेस्टकडे ज्या ओपन बसेस आहेत त्या खराब झालेल्या होत्या. त्या अवस्थेत नव्हत्या की त्या कालच्या पूर्ण मिरवणुकीत आपल्या खेळाडूंना घेऊन जाऊ शकतील. म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोशिअनने तो निर्णय घेतला. त्यात एवढा बागुलबुवा करण्याची काहीच गरज नाही, कारण अन्य वेळी संजय राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही.


पुढे ते म्हणाले, सकाळी हा बोंबाबोंब करतो आणि संध्याकाळी अंबानीच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला बसतात, अदानींच्या बाबत काँग्रेसवाले सभागृहात बोंब मारतात आणि मग त्यांचेच नेते अदानींच्या प्रायव्हेट फ्लाईटमधून देशभरात प्रवास करतात. विजय वडेट्टीवारांना काल मला आठवण करुन द्यायची होती की अदानींबाबत बोलण्याअगोदर अदानींचा खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्याबरोबर आहे. जो मुंबईत आल्यानंतर अदानींची गाडी चालवतो. तोच ड्रायव्हर काल मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता. मग संध्याकाळी वानखेडेमध्ये रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्यामागे पोट धरुन पळत होता. मग हा जो काही डबलढोलकीपणा आहे हा महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिली आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम