Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद


लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना त्याचा एक गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत एकामागोमाग एक खुलासे होत असताना गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठी माहिती समोर आली आहे. हा भोलेबाबा दुधाने अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनी पोलिसांना सांगितला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येता गावकऱ्यांनी भोलेबाबाला विरोध केला. तसेच त्याच्यापासून नागरिकांनी अंतर ठेवायलाही सुरुवात केली.


दरम्यान, फरार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भोलेबाबाने चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करुन आपली प्रतिक्रिया दिली. मात्र या दुधाच्या खीर प्रकरणी सर्व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचसोबत पोलीस भोलेबाबाचा आणखी तपास करत आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या