मुंबई : पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात पहिला झिकाचा (Zika Virus) रुग्ण आढळला होता. त्यानंतर एकामागोमाग एक असे सहा जणांना झिकाची लागण झाल्याने समोर आले होते. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु आता झिका व्हायरस केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभर पसरला आहे. राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात झिका व्हायरसचे एकूण आठ रुग्ण आढळले आहेत. झिका व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांची धाकधूक वाढत चालल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा, एंरडवनमध्ये झिकाचे रुग्ण आढळले. त्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक असा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. राज्यभरात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Health Ministry) राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार झिका विषाणूच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले.
झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो. यामुळे गर्भवती महिलांचे झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य सुविधांनी आपल्या परिसरात एडिस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबवणे,असे म्हटले आहे.
राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छ. संभाजीनगर येथे झिकाच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…