
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. मरीन ड्राईव्हवर तर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
चारही बाजूंनी टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारकडून चार मुंबईकर खेळाडूंना बक्षीस जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जायसवाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार केला जाणार आहे. तसेच या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंचा शुक्रवारी संध्याकाळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार केला जाईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ जूनला फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत टी-२० वर्ल्डकप खिताबावर आपले नाव कोरले होते. भारतीय संघाने चुरशीच्या सामन्यात अखेर बाजी मारत ही ट्रॉफी जिंकली.