Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी


मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session 2024) सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधान परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी दानवेंचा तोल सुटला आणि दानवे यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले. यानंतर दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतरही 'आंदोलन करा किंवा कोर्टात जा, जिथे जिथे जायचे आहे तिथे जा, काय करायचे ते करा, भाजपाने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही.', अशी टोकाची भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली होती.


त्यानंतर अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह, उपसभापती, सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली. तसेच अंबादास दानवे यांची चांगलीच कानउघडणी केली.


त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून शिवीगाळ प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे.


या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि. १ जुलै रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.


सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिणींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती, असेही पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध