तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. येथे लोकांना रिचार्ज प्लानची वाढलेली किंमत पाहून नक्कीच धक्का बसू शकतो. यासोबतच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसू शकतो. जिओने नव्या प्लानची यादी जाहीर केली आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की जिओच्या काही प्रीपेड प्लानसोहत अनलिमिटेड ५जी फायदा होणार नाही.


रिलायन्स जिओ केवळ त्याच प्रीपेड प्लानवर अनलिमिटेड ५ जी डेटा देणार आहे जे दर दिवशी २ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा अधिक डेटा वापरतात. याचाच अर्थ दर दिवशी १.५ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा कमी डेटाच्या प्लानमध्ये ५ जी इंटरनेट डेटाची सुविधा मिळणार नाही.



२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लान ज्यात ५ जी डेटा मिळतो


३४९ रूपयांचा प्लान - आधी याची किंमत २९९ रूपये होती आता यासाठी ३४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


३९९ रूपयांचा प्लान - आधी या प्लानची किंमत ३४९ रूपये होती त्यासाठी आता ३९९ रूपये द्यावे लागतील. यात दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


४४९ रूपयांचा प्लान - याआधी या प्लानची किंमत ३९९ रूपये होती आता त्यासाठी ४४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे