Ambadas Danve : शिवीगाळ करणं पडलं महागात! अंबादास दानवेंना केलं निलंबित

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली घोषणा


मुंबई : विधानपरिषदेत (Vidhanparishad) कालच्या अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्याकडे हात करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत काल राडा झाला होता. यादरम्यान, दानवेंनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना पाच दिवसांकरता निलंबित करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ही घोषणा केली.


'बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का?' असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं होतं. यानंतर आज प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.


यानंतर आज नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला व तो मतदानाकरता देण्यात आला. आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. अंबादास दानवेंच्या निलंबनाची घोषणा करताच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले.


नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. सभागृहात अशी घटना कधीही घटना घडली नाही त्यामुळे अशा ठरवावर कधीही चर्चा होत नाही, असे फडणवीस म्हणाले. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं.



निलंबनानंतर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?


उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गटनेत्यांच्या बैठकीला अंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल. म्हणून ही न्याय्य आणि उचित कारवाई केली आहे, असं उपसभापती गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल