Kalki AD 2898 Part 2 : प्रभासच्या चाहत्यांसाठी खूशखबर! लवकरच येणार 'कल्की २८९८ एडी-भाग २'

चित्रपटाचे शूटिंग ६० टक्के पूर्ण


मुंबई : अभिनेता प्रभास (Prabhas) याचा बहुचर्चित असणारा 'कल्की २८९८ एडी' (Kalki AD 2898) चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. अवघ्या दोन दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. तर लवकरच ३०० कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनेक चित्रपटगृहांचे शो सध्या हाऊसफुल होत आहेत. देश परदेशात प्रभासच्या या 'कल्की २८९८ एडी' बाबत चर्चा सुरु असताना प्रभासच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे.


'कल्की २८९८ एडी' चित्रपटाला भरघोस यश मिळत असताना आता 'कल्की २८९८ एडी-भाग २' ('Kalki AD 2898' Part 2) येणार असल्याची माहिती मिळत आहे. चित्रपट निर्मात्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 'कल्की २८९८ एडी'ची गोष्ट पाहता निर्मात्यांनी त्यावेळीच दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आधीपासूनच चित्रपटाचा भाग २वर काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर जोरदार काम सुरू आहे. या चित्रपटाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता चित्रपटाचे व्हिएफएक्स (VFX ) वर काम सुरू असून लवकरच हा चित्रपट भेटीला येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.


दरम्यान, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अभिनेता रजनीकांत यांनी देखील 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट पाहिला. त्यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टीच्या रिलीजची वाट मी पाहात असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०००कोटींचा टप्पाही पार करेल असे प्रभासचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६