Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीAI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

AI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा

मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांच्या आयुष्यातील प्रश्न सर्रास सोडवले जात आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा फोन बनला आहे. अनेकदा फोनमध्ये नवीन अपडेट येत असतात. अशातच सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच ‘एआय’ (AI) ची चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि मेटा एआयवर उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रत्येकाला आता कोणत्याही विषयाबाबत सखोल माहिती मिळवण्यासाठी सोयीचे साधन असणार आहे. मात्र याच एआयबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. हाय एआय तुमच्या मोबाईलमधला गुप्तहेर (AI Threat) बनला आहे. त्यामुळे मोबाईलमधला सर्व डेटा धोक्यात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एआयकडून मिळालेल्या सर्व सुविधा आकर्षक असल्या तरी त्यांची किंमत म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा आहे. कंपन्यांना एआयला सर्वोत्कृष्ट साधन बनवण्याच्या मोहात त्याला लागणाऱ्या माहितीसाठी क्लाउडचा वापर करतात. मात्र एकदा तुमची माहिती क्लाउडवर गेली की ती सुरक्षित राहण्याची शाश्वती नसते. यामुळे कोणतीही कंपनी, कर्मचारी, सरकारी संस्था किंवा हॅकर्स हा डेटा सहज पाहू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले.

दरम्यान, अनेक कंपन्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आपला डाटा गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे वापरकर्त्यांचा डाटा हा फार कमी सुरक्षित असतो. त्यामुळे कंपन्यांनी वापरकर्ताच्या गोपनीयतेची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -