UGC NET Exam : पेपरफुटी प्रकरणाला बसणार लगाम! आता 'या' पद्धतीने होणार परीक्षा

परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर


मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam) लीक (Paper Leak) झाल्यामुळे मंगळवारी (१८ जून) रोजी होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला, मात्र तरीही त्या मुद्द्यावरून मोठे वाद निर्माण होत होते. त्यामुळे सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या पुर्नपरीक्षेबाबत नव्या तारखा जारी केल्या असून आता वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) काल यूजीसी नेट २०२४ परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या. ही परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुन्हा घेतली जाईल, असे NTA ने अधिसूचनेत म्हटले आहे. त्याचबरोबर ही परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल, असे देखील अधिसूचनेत म्हटले आहे.


तसेच NCET २०२४ साठी संगणक आधारित चाचणीची तारीख १० जुलै रोजी असेल, तर संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत होईल. दरम्यान, अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET) २०२४ पूर्वीच्या नियोजित वेळेनुसार म्हणजेच ६ जुलै रोजी होणार आहे.



परीक्षेत पडणार नव्या विषयाची भर


विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (युजीसी नेट) आता नव्या विषयाची भर पडणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत 'आपत्ती व्यवस्थापन' विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. सहायक प्राध्यापक पदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच.डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. युजीसी नेट परीक्षेत सध्या ८३ विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचाही समावेश करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार