IND vs SA: कोहलीचे अर्धशतक, भारताचे द. आफ्रिकेला १७७ धावांचे आव्हान

मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.


भारताला पहिला धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजीस सुरूवात केली खरी मात्र केशव महाराजचा तो बळी ठरला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सूर्य कुमार यादव मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रबाडाने त्याला ३ धावांवर बाद केले.


त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली. अक्षर पटेलने या सामन्यात ४७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तर विराट कोहलीने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ५९ चेंडूमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावताना ७६ धावा साकारल्या.


पटेल गेल्यानंतर विराटने शिवम दुबेला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने २७ धावा केल्या. खरंतर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चांगल्या धावा करणे गरजेचे होते. मात्र तितक्याशा चांगल्या होऊ शकल्या नाहीत. अखेर भारताची धावसंख्या १७६वर संपुष्टात आली.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना