पेपरफुटी रोखण्यासाठी आता नव्या पद्धतीने परीक्षा!

Share

युजीसी नेट २०२४ परीक्षेसाठी नवीन तारखा जाहीर

१० जुलै ते ४ सप्टेंबर दरम्यान तीनही ऑनलाईन पेपर होणार

नवी दिल्ली : पेपरफुटी रोखण्यासाठी आता नव्या पद्धतीने परीक्षा अवलंब करत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने युजीसी-नेट२०२४ परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या. ही परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुन्हा घेतली जाईल,असे एनटीएने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

युजीसी नेट जून २०२४ परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी मोडमध्ये घेतली जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. तसेच,एनसीइटी२०२४ साठी संगणक आधारित चाचणीची तारीख १० जुलै असेल, तर संयुक्त सीएसआयआर-युजीसी नेट परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत होईल. दरम्यान,अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा२०२४ पूर्वीच्या नियोजित वेळेनुसार ६ जुलै रोजी होणार आहे.

यापूर्वी १८ आणि १९ जून रोजी परीक्षा नियोजित करण्यात आली होती. १८ जूनच्या परीक्षेला ३१७ हून अधिक शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु,१९ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर लिक झाल्याचे कारण देत ही परीक्षा रद्द करण्यात आली. “डार्कनेटवरील युजीसी-एनइटी प्रश्नपत्रिका युजीसी-नेटच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पेपरफुटीची आम्ही जबाबदारी घेतो आणि व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करतो”, असे नवनिर्वाचित शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

सीएसआयआर यूजीसी नेटवरही परिणाम

सीएसआयआर यूजीसी नेटवरही या पेपरफुटीचा परिणाम झाला. ही परीक्षा २५ ते २७ जून रोजी होणार होती. याचीही प्रश्नपत्रिका डार्क वेबवर लीक झाल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाही पुढे ढकलली.युजीसी नेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक,कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि भारतीय विद्यापीठातील पीएचडी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणीसाठी पात्रता ठरवण्यासाठी जून आणि डिसेंबरमध्ये वर्षातून दोनदा आयोजित केले जाते. विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (युजीसी नेट) आता नव्या विषयाची भर पडणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. सहायक प्राध्यापक पदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच.डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. युजीसी नेट परीक्षेत सध्या ८३ विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

23 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

44 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago