CM Eknath Shinde : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' लागू करणार!

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा


मुंबई : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) सुरु आहे. यामध्ये काल अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला व त्यात महिला, शेतकरी, तरुण वर्ग अशा सर्वांसाठीच राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यातच आणखी एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Chief Minister Pilgrimage Scheme) राज्य सरकारने सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.


शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी याबाबतची मागणी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र संताची भूमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वधर्मीयांसाठी ही योजना सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करु. या योजनेचा आशीर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Comments
Add Comment

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक