फायनलमध्ये पोहोचताच रडायला लागला रोहित शर्मा, पाहा Video

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) स्थान मिळवले आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये २७ जूनला सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडला ६८ धावांनी हरवले.


सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ १६.४ षटकांत १०३ धावांवर आटोपला.


हा सामना संपल्यानंतर या विजयी क्षणी रोहित शर्मा अतिशय भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याला विराट कोहलीने सावरले. रोहित शर्मा ड्रेसिंग रूमध्ये बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक यूजर्सनी शेअर केला.


 


रोहितने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत ५७ धावा ठोकत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानला ९ विकेटनी हरवत टी-२० वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने २००७मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.

Comments
Add Comment

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण