Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

Share

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही संघादरम्यान हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यांचा सामना आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. फायनलचा सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

रोहितने अर्धशतक ठोकत रचला इतिहास

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित असा कर्णधार आहे ज्याने टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट सामन्यात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्यात. रोहितने ३९ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.

रोहितने या खेळी दरम्यान भारतीय कर्णधाराने ५००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पाचवा कर्णधार आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हे यश मिळवले होते.

विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून एकूण२१३ सामन्यांमध्ये १२८३३ धावा केल्यात तर धोनी ११२०७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावा आणि सौरव गांगुली ७६४३ धावा यांचा नंबर लागतो.

रोहित शर्माला २०२१मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारापासून दूर झाल्यानंतर त्याला नेतृत्व सोपवण्यात आले.

Recent Posts

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

25 mins ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

44 mins ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

2 hours ago

AI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून…

2 hours ago

Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीवर येणार की नाही?

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता…

3 hours ago

Toll Rate : मुंबईकरांचा प्रवास महागणार! टोलच्या दरात वाढ होणार

मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरून (Nashik Mumbai Highway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी (Toll) आता अधिक रक्कम मोजावी…

4 hours ago