नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शुक्रवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता की त्यामुळे ८८ वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. मुसळधार पावसामुळे दिल्लीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
मुसळधार पावसामुळे दिल्लीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. मुसळधार पावसामुळे ऑफिसला जाणारी नोकरदार मंडळी आणि इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यादरम्यान, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ च्या पार्किंगचे छप्पर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर लुटियन्स झोनमधील खासदारांच्या निवासस्थानामध्येही पाणी भरले.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे सकाळपासून वाहतुकीबाबतच्या समस्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरात पाणी भरल्याने प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. काही ठिकाणी मेट्रो स्टेशन परिसरातही पाणी तुंबल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी तुंबल्यामुळे अणुव्रत मार्गावर सिग्नलच्या दोन्ही बाजूंनी आणि लाडो सराय सिग्नलच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली.
रिंग रोडवर धौला कुआँ फ्लायओव्हरखाली नारायणा ते मोतीबागेच्या दिशेने दोन्हीकडे वाहतूक संथावली होती. तर आझाद मार्केट अंडरपासमध्ये वीर बंदा बैरागी मार्गावरही वाहतुकीची समस्या निर्माण झाली. मथुरा रोजवर आश्रमपासून बदरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. तर रोहिणी येथे एक कार रस्ता खचून आत अडकली. तर ज्वालाहेडी मार्केटसमोर एक झाड कोसळल्याने मादीपूर मार्गावरही वाहतूक कोंडी झाली.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…