पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

  172

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण ११.२५ मिलियन यूएस डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. भारतीय पैशांमध्ये ही रक्कम एकूण ९३.५ कोटी रूपये इतकी आहे.


२०२२मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत ही बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. कारण २ वर्षांपूर्वी ही रक्कम ४६.६ कोटी रूपये इतकी होती. यातील विजेता संघ इंग्लंडला तब्बल १३.३ कोटी रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. जाणून घेऊया २०२४च्या टी-२० वर्ल्डकप विजेता बनणाऱ्या संघाला किती रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असतील. यातील जो विजेता बनेल. त्याला भारतीय पैशांनुसार २०.४ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरीकडे उपविजेता संघाला याच्या अर्धी रक्कम म्हणजेच १०.६ कोटी रूपये दिले जातील. या वर्ल्डकपमध्ये सर्वात खालच्या स्थानावरील संघालाही पैसे दिले जातील. सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे संघही मालामाल होतील. कारण त्या दोन संघांना तब्बल साडेसहा कोटी रूपये मिळणार आहेत.



प्रत्येक सामना जिंकल्यास २६ लाख रूपये


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर २६ लाख रूपये वेगळे मिळणार. आयसीसीने ही बक्षिसाची रक्कम आपल्या प्रावधानात जोडली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या स्पर्धेत एखादा संघ केवळ एकदा विजय मिळवू शकला तर त्यांना २६ लाख रूपये वेगळे मिळतील. तर २ सामने जिंकणाऱ्या संघाला ५२ लाख रूपये वेगळे मिळतील.

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून