IND vs ENG: अक्षर, कुलदीपची कमाल, इंग्लंडला नमवत टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला ६८ धावांनी हरवले. आता फायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी भारताने १७१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या स्पिनर्सनी कमाल केली आणि इंग्लंडला डाव १०३ धावांत गुंडाळला. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी केली होती.


भारताची सुरूवात तशी ठीकठाक झाली. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. भारताने १९ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही केवळ ४ धावा करू शकला.


त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सूर्याने ३६ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. मात्र त्यालाही २३ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षऱ पटेलने १० धावा केल्या.


त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले. मात्र स्पिनर्सनी कमाल करत जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या अक्षऱ पटेल, कुलदीप यादव या दोघांनी तर अफलातून गोलंदाजी केली आणि इंग्लंडला सळो की पळो करून टाकले.


आता भारताचा फायनलमध्ये सामना २९ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला हरवले आणि फायनलमध्ये एंट्री घेतली
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे