Health: दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीरात होतील हे बदल, आठवड्याभरात दिसेल फरक

मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक जण ज्यूस म्हटला की मोसंबी अथवा संत्र्‍याचा पितात मात्र डाळिंबाचा ज्यूसही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.



डाळिंबाचे दाणेच का खातात?


डाळिंब हे पुनिका ग्रेनेटम झाडाचे फळ आहे. हे फळ कडू असते. यामुळे याच्या केवळ बियाच खाल्ल्या जातात. एका डाळिंबामध्ये साधारण ३० मिलिग्रॅम व्हिटामिन सी असते जे एका दिवसाला लागणाऱ्या व्हिटामिन सीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो.



डाळिंबाचे फायदे


पोटासाठी चांगले


जर तुम्ही दररोज डाळिंब खात आहात तर पोटासाठी हे चांगले आहे. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे हे खाल्ल्याने हेल्दी गट मायक्रोबायोमचे उत्पादन वाढते.


मेंदूसाठी चांगले


डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहेत जे नर्व्हस सिस्टीम डॅमेज होण्यापासून वाचवतात. यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण