Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीFarmers protest : विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचं दूध ओतून आंदोलन!

Farmers protest : विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचं दूध ओतून आंदोलन!

प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session of Legislature) आज दुसरा दिवस असून विधानभवनाबाहेर (Vidhanbhavan) दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) आक्रमक झाले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. या संतापातच त्यांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या प्रतिलीटर दूधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी हातामध्ये सरकारविरोधातील फलक घेऊन त्यांनी आदोलन केले. १५ हजार टन दूध पावडर आयात का केली जातेय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. यावेळी विधानभवनाबाहेर काही आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, एकीकडे विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे दूध दरवाढीमुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. याप्रकरणी सध्या महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -