मुलांना कितव्या वयापासून ड्रायफ्रुट्स खायला द्यावेत? घ्या जाणून

मुंबई: मुलांना ड्रायफ्रुट्स खायला देणे ही चांगली सवय आहे. मात्र अनेक आई-वडिलांना हे माहीत नाही की हे कधीपासून सुरू केले पाहिजे. अधिकतर डॉक्टर सल्ला देतात की मुलांना ९ ते १२ महिन्यापासून ड्रायफ्रुट्स खायला दिले पाहिजेत. मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक मूल वेगळे असते यामुळे आपल्या मुलांच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सुरूवातीच्या दोन वर्षांपर्यंत तुम्ही मुलांना ड्रायफ्रुट्स बारीक वाटून देऊ शकता.

२ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना ड्रायफ्रुट्स कमी प्रमाणात द्या. दिवसातून एक बदाम अथवा अर्धे अक्रोड पुरेसे आहे. अधिक खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ड्रायफ्रुट्स अतिप्रमाणात देणे योग्य ठरत नाही. कारण त्यांची पाचनअवस्था अद्याप तयार झालेली नाही.

सुरूवातीला थोडे कमी प्रमाणात द्या. ड्रायफ्रुट्स तुम्ही वाटून अथवा पाण्यात भिजवून देऊ शकता. बदाम, मनुके आणि खजुरापासून सुरूवात करा. मोठे तुकडे देऊ नका. ते गळ्यात अडकू शकतात.
Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे