Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीLoksabha speaker : लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा देऊ, पण...

Loksabha speaker : लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा देऊ, पण…

विरोधी पक्षातर्फे राहुल गांधींनी समोर ठेवली एक अट

नवी दिल्ली : लोकसभा निकालानंतर (Loksabha result) आता एनडीएचं सरकार (NDA government) स्थापन झालं असून खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. त्याच दरम्यान, आता लोकसभेतील महत्त्वाची अध्यक्षनिवडीची प्रक्रिया (Lok Sabha Speaker Election) होणार आहे. यासाठी एनडीए ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा आपला उमेदवार बनवणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत इंडिया आघाडीने एनडीएच्या उमेदवाराला (NDA Candidate) पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. ही विनंती विरोधी पक्षाने मान्य केली मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे.

विरोधी पक्षातर्फे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एनडीए सरकारसमोर अट ठेवली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देऊ, पण लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळालं पाहिजे, अशी ती अट आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही राजनाथ सिंह यांची विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, पण लोकसभेचं उपसभापती पद मात्र विरोधकांना मिळालं पाहिजे. मल्लिकार्जुन खर्गे यांना परत फोन करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही. सहकार्य हवं, असं पंतप्रधान मोदी सांगत आहेत. मात्र, आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्पष्ट नाही.

अखिलेश यादवांचीही तीच मागणी

दुसरीकडे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विरोधक सभापतीपदासाठी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र उपसभापतीपद आम्हाला मिळावं हीच आमची मागणी स्पष्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवार कोण?

लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरी यांची नावं चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएने ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचं उमेदवार बनवलं आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उद्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. जर विरोधकांनी सभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर निवडणूक होणार नाही. विरोधकांना उपसभापतीपद हवं असून ते सभापतीपदासाठी उमेदवार देण्याच्या बाजूने नसल्याचं सांगण्यात येत आहे.

जर भाजपने उपाध्यक्षपद दिलं नाही तर…

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. तर लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाला मिळावं, अशी इंडिया आघाडीची मागणी आहे. दरम्यान, जर भाजपने उपाध्यक्षपद दिलं नाही तर अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडी उमेदवार उतरवण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -