BJP in Vidhnaparishad : दिल्लीत भाजपाच्या मोठ्या हालचाली! बावनकुळे आणि फडणवीस नड्डांच्या भेटीला

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली चर्चा?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाला (BJP) झटका सहन करावा लागल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhanparishad Election) दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी काल रात्री राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे देखील आता समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील (VidhanParishad Election 2024) उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप (BJP) पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील ३५ जण इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृत्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.


विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात, अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.



मंत्रिमंडळ विस्तारावर देखील झाली चर्चा


विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.



राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार


महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक