Success Mantra: दररोज करा ही ५ कामे, बदलून जाईल तुमचे जीवन

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुढे जायचे असते. या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या दिनचर्येचा आपल्या जीवनावर गहन परिणाम होतो. तुमच्या रूटीनमध्ये तुम्ही छोटे छोटे बदल करून तुम्ही जीवनात मोठा बदल घडवून आणू शकता. जाणून घ्या कोणती अशी कामे आहेत जी तुम्ही दररोज केली पाहिजे.

आभार व्यक्त करा


दर दिवशी काही मिनिटे जे काही तुम्हाला मिळाले आहे त्याबद्दल विचार करा आणि आभार माना. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे आभार माना. चांगले आरोग्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना. यामुळे मूड नेहमी चांगला राहतो. तसेच तणाव कमी होतो.

एक्सरसाईज करा


नियमित व्यायामामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. व्यायामामुळे हृदय, फुफ्फुसे आणि मांसपेशी मजबूत होतात. वजन कमी करण्यास मदत होते. मूड चांगला बनतो आणि तणाव कमी होतो. दररोज ३० मिनिटे एक्सरसाईज करा.

चांगले जेवण करा


आपण जे खात असतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आपल्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या, अख्खे धान्य तसेच अधिकाधिक प्रोटीनचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड, साखर आणि फॅटी पदार्थ खाऊ नका.

पुरेशी झोप घ्या


जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर आणि मेंदू रिचार्ज होतो. प्रत्येकाला रात्रीच्या वेळेस कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. वेळेवर झोपण्याची तसेच वेळेवर उठण्याची सवय लावा.

मजेशीर अॅक्टिव्हिटी करा


दरदिवशी काहीतरी मजेशीर अॅक्टिव्हिटी करा. जसे की वाचणे, संगीत ऐकणे, फिरणे अथवा मित्र-कुटुंबासोबत वेळ घालवणे. असे केल्याने तुम्हाला आनंद भेटेल.
Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर