Friday, June 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHajj pilgrims : OMG! आत्तापर्यंत तब्बल १३०० हज यात्रेकरुंचा मृत्यू; इजिप्तकडून १६...

Hajj pilgrims : OMG! आत्तापर्यंत तब्बल १३०० हज यात्रेकरुंचा मृत्यू; इजिप्तकडून १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द

रियाध : यावर्षी हज (Hajj) यात्रेदरम्यान सौदी अरेबियामध्ये तब्बल १३०० पेक्षा अधिक लोकांचा (Hajj pilgrims) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील १३०१ मृत्यूंपैकी ८३ टक्के अनधिकृत यात्रेकरू होते. जे पवित्र शहर मक्का आणि आसपास हज विधी पार पाडण्यासाठी वाढत्या तापमानात लांब अंतर चालत होते. ९५ यात्रेकरूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यापैकी काहींना राजधानी रियाधमध्ये उपचारांसाठी विमानाने नेण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक मृत यात्रेकरूंकडे ओळखीची कागदपत्रे नसल्याने ओळख प्रक्रियेला उशीर झाल्याचेही सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनी सांगितले. यातील मृतांना ब्रेकडाउन न देता मक्का येथे मुस्लिम प्रथेनुसार पुरण्यात आले, असेही ते म्हणाले.

मृतांमध्ये ६६० हून अधिक इजिप्शियन लोकांचा समावेश आहे. कैरोमधील दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी ३१ वगळता सर्व अनधिकृत यात्रेकरू होते. इजिप्तने १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द केले आहेत, ज्यांनी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्यास मदत केली. याची दखल घेत सर्वांचे परवाने आता रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, बहुतेक मृतांची नोंद मक्काच्या अल-मुईसेम परिसरातील इमर्जन्सी कॉम्प्लेक्समध्ये झाली असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढले असल्याचे सौदीतील अधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केले आहे. अल-जलाजेल यांनीही याबाबत माहिती दिली.

नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक मृतांची नोंद मक्काच्या अल-मुईसेम परिसरातील इमर्जन्सी कॉम्प्लेक्समध्ये झाली आहे. इजिप्तने यावर्षी ५० हजारांहून अधिक अधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठवले.

सौदी अधिकाऱ्यांनी अनधिकृत यात्रेकरूंवर कारवाई केली आणि हजारो लोकांना बाहेर काढले. परंतु बहुतेक इजिप्शियन, मक्का आणि आसपासच्या पवित्र स्थळांवर पायी पोहोचण्यात यशस्वी झाले. अधिकृत यात्रेकरूंप्रमाणे, त्यांच्याकडे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हॉटेल नव्हते.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार मृतांमध्ये इंडोनेशियातील १६५, भारतातील ९८ आणि जॉर्डन, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि मलेशियामधील डझनभर अधिक यात्रेकरूंचा समावेश आहे. दोन अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हजमध्ये सातत्याने मृत्यू होत आले आहेत. २ दशलक्षाहून अधिक लोक पाच दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. या यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरी होते. तर अनेकदा साथीचे आजारही पसरले आहेत. २०१५ मध्ये, मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २४०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी आतापर्यंतची सर्वाधिक प्राणघातक होती. तर त्याच वर्षाच्या सुरुवातीला मक्काच्या ग्रँड मशिदीत एक वेगळी क्रेन कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -