मुंबई : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकार मोठे बदल करत असते. त्यातच जून महिन्याचा अखेर जवळ आला असून आरबीआयकडून (RBI) मोठे बदल होणार आहेत. क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार, १ जुलैपासून क्रेडिट कार्डसंदर्भात नवा नियम जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना कार्डद्वारे बिल भरणे महाग पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या महितीनुसार, १ जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही सिस्टीम आणली आहे. त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे.
१ जुलैपासून लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. देशभरात एकूण ३४ बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आतापर्यंत यातील केवळ ८ बँकानी बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे, असे बँकांनी म्हटले आहे.
एचडीएफसी (HDFC) बँकेने आतापर्यंत २ कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने १.७ कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. तर अॅक्सिस (Axis Bank) बँकेचे एकूण १.४ कोटी क्रेडिट कार्ड आहेत. मात्र या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. त्यामुळे फोन पे, क्रेड, तसेच अन्य अ पवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या अॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डचे बील भरता येणार नाही.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…