Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत सायबर गुन्ह्यात ७०० टक्क्यांहून अधिक वाढ

मुंबईत सायबर गुन्ह्यात ७०० टक्क्यांहून अधिक वाढ

गुंतवणूक फसवणुकीत ३५५ गुन्ह्यांची नोंद

मुंबई : जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून मुंबई शहर देखील त्याला अपवाद नाही. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत मुंबईत गुंतवणुकीच्या फसवणुकीशी संबंधित सायबर गुन्ह्यांमध्ये ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून शहरात या वर्षात ३५५ गुंतवणूक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

आकडेवारीनुसार, या वर्षी मुंबईत ३५५ गुंतवणुकीतील फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी केवळ ७६ प्रकरणे उघडकीस आली आहेत. प्रकरणांमध्ये ९१ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गुंतवणुकीत फसवणुकीचे ४२ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी सहा प्रकरणे उघडकीस आली आहेत. या फसवणुकीमध्ये २० जणांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार घोटाळेबाजांनी वापरलेली मोडस-ऑपरेंडी अशी आहे की ते प्रथम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गुंतवणूक योजनांची जाहिरात करतात आणि पीडितांना त्यांनी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करतात, ते स्टॉक ट्रेडिंगची माहिती सांगतात. त्यानंतर पीडितांना बोगस ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले जाते आणि त्याद्वारे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. पीडितांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास प्रवृत्त केले जाते आणि त्यांना ॲपमध्ये त्यांची कमाई पाहता येते. पीडितांनी सांगितलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना त्यातील पैसे काढायचे असल्यास अधिक पैसे देण्यास सांगितले जाते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली जाते.

या वर्षी मार्चमध्ये, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने नागरिकांना खोट्या ट्रेडिंग ॲप्सचा वापर करून फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजांबद्दल जागृत करणारी सूचना जाहीर केली होती. त्यामध्ये असे नमूद केले होते की, स्टोअर्स, वेबसाइट्स, जाहिराती किंवा सोशल मीडिया पोस्ट, चॅट्स, एसएमएसमध्ये मिळालेल्या लिंक्सवरून ॲप्स डाउनलोड करणे टाळा. केवळ वैध वेबसाइट किंवा अधिकृत ॲप स्टोअर्स सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. विकासकाच्या वेबसाइटवर ॲप तपशीलांची योग्यरित्या पडताळणी करा किंवा कोणत्याही ॲपच्या कार्यासाठी आवश्यक असलेली परवानगी नेहमी द्या, संबंधित ॲप्स, कोणतेही ॲप्लिकेशन स्थापित करण्यापूर्वी, सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची काळजीपूर्वक तपासणी करा किंवा https://www.cybercrime.gov.in ला भेट द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -