स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती जाहीर

Share

माजी इस्त्रो प्रमूख डॉ. के राधाकृष्णन करणार समितीचे नेतृत्त्व

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत देशभरात निदर्शने सुरू असून, सरकारने नीट परीक्षा रद्द करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यात आता शिक्षण मंत्रालयाने देशातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती जाहीर केली आहे. या समितीचे नेतृत्त्व माजी इस्त्रो प्रमूख डॉ. के राधाकृष्णन (Former Istro chief Dr. K Radhakrishnan) करणार असून, या समितीत एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे.

ही समिती परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी काम करणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करणे, डेटा सुरक्षा मजबूत करणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कामकाजावर शिफारशी सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ही समिती त्यांचा अहवाल २ महिन्यांच्या आत शिक्षण मंत्रालयाला सादर करणार असून, ज्यामध्ये परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि प्रक्रिया न्याय्य करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश असेल असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

समितीतील सदस्य..

  • डॉ. के राधाकृष्णन, माजी इस्त्रो प्रमूख
  • डॉ. रणदीप गुलेरिया, दिल्ली एम्सचे माजी संचालक
  • प्रो. बी. जे. राव, कुलगुरू, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद
  • प्रो. राममूर्ती के प्रोफेसर एमेरिटस, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, आयआयटी मद्रास
  • पंकज बन्सल, पीपल स्ट्रॉन्गचे सह-संस्थापक आणि कर्मयोगी भारतचे बोर्ड सदस्य
  • प्रो. आदित्य मित्तल, डीन स्टूडेंट अफेयर्स, आयआयटी दिल्ली
  • गोविंद जायस्वाल, संयुक्त सचिव, शिक्षण मंत्रालय

Recent Posts

Test match : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…

53 mins ago

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब

पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…

1 hour ago

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…

2 hours ago

पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण

पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…

3 hours ago

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

4 hours ago

MP News : दिल्लीतल्या बुरारी प्रकरणाची मध्यप्रदेशात पुनरावृत्ती! दिवसही १ जुलैचाच!

मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…

5 hours ago