Kalki 2898 AD : प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' चा परदेशात धुमाकूळ!

प्रदर्शित होण्याआधीच विकली ५५,५५५ तिकीटे


वॉशिंग्टन : 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांकडून चित्रपटाचे देश परदेशात देखील मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले जात आहे. काही दिवसांत हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच एक मोठा टप्पा गाठला आहे. चित्रपट भारताबाहेर जास्तीत जास्त प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी चित्रपट निर्माते अथक प्रयत्न करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच उत्तर अमेरिकेत चाहत्यांकडून मोठ्या जोमाने तिकीटे बुक केली जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाने अमेरिकेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'कल्की २८९८ एडी’ चित्रपट देशातील तसेच परदेशातही लोकांना मोठ्या प्रमाणावर पाहता येईल, यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. उत्तर अमेरिकेत प्रभासच्या चित्रपटाचे प्री-बुकिंग (Pre Booking) सुरू झाले असून तिकीटे धडाधड विकली जात आहेत. रिलीज होण्यापूर्वीच ‘कल्की २८९८ एडी’ची ५५,५५५ तिकिटे विकली गेली आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर निर्मात्यांना आनंद अनावर झाला आहे. तर सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता निर्मात्यांकडून वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, २७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नाग अश्विन यांनी दिग्दर्शन केले आहे. तर वैजयंती मुव्हीज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कमल हासन आणि दिशा पटानीसह अनेक कलाकार ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दिसणार आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहण्याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१