Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Pankaja Munde : पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? भाजपाच्या गोटात नेमक्या काय हालचाली?

Pankaja Munde : पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? भाजपाच्या गोटात नेमक्या काय हालचाली?

दिल्लीत पार पडली महत्त्वाची बैठक


मुंबई : बीड लोकसभा निवडणुकीत (Beed Loksabha) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागल्याने त्यांचे समर्थकही प्रचंड नाराज झाले. यातूनच पंकजा मुंडे निवडून न आल्याने काही समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या नाराज समर्थकांना खुश करणारी एक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेत (Rajyasabha) पाठवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याचे समजत आहे. तसं झालं तर हा पंकजा मुंडेंच्या समर्थकांसाठी आनंदाचा धक्का असेल.


दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.


राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती आहे.



पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या


पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेतील पराभव त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. मुंडे समर्थक कमालीचे निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील ४ मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहन केले होते.

Comments
Add Comment