T-20 world cup 2024: सूर्याचे वादळ, बुमराहचा कहर,सुपर ८मध्ये भारताचा अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय

बार्बाडोस: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी हरवले. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. आधी सूर्यकुमार यादवने धावांचे वादळ आणले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याच्या जोरावर भारताला हा विजय साकारता आला.


सुपर ८मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना २२ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवला जाईल.


भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.


भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.


शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गोलंदाजीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट काढल्या. तर कुलदीप यादवला २ आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच