‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’

८२ हजार १०३ ग्रामस्थांना आजही टँकरच्या पाण्याचा दिलासा


ठाणे : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. काळे ढग येतात, आकाश अंधारून येते, पाऊस मात्र पडत नाही, ढग मात्र निघून जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना ‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’ असा टाहो फोडण्याची आता वेळ आलेली आहे. जून महिना अर्धा लोटला तरी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही ४८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.


जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीवघेणी पाणीटंचाई जूनचा अर्धा महिना संपला तरी कायम आहे. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ मोठ्या लोकवस्तीच्या गावांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.


शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. मुरबाड तालुक्यातील १७ मोठी लोकवस्तीची गावे आणि १८ पाड्यांसाठी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुरबाडमधील ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टँकरने १ लाख १ हजार ७०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास