Shivneri Bus : स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी धावणार

अटल सेतूमार्गे प्रवास जलद होणार


मुंबई : मंत्रालयातील कामांव्यतीरिक्त इतर कामांसाठी मुंबई ते पुणे (Mumbai To Pune) असा प्रवास करणा-यांसाठी एसटी महामंडळाने (ST Corporation) स्वारगेट - मंत्रालय - स्वारगेट अशी शिवनेरी बस (Shivneri Bus) सेवा मंगळवारपासून सुरु केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस सेवा धावणार असून, या शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे (Atal Setu Bridge) होणार आहे.


मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर ब-यापैकी कमी झाले असून, आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत. पुणे ते दादर असा अटल सेतूवरून प्रवास करणा-या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. पुणे गाठण्यासाठी रेल्वे असली तरी तुलनेने ही सेवा अपुरी पडत असल्याने मंत्रालयीन कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वागरगेट सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरु करण्यात आली आहे.


सोमवारी मंत्रालयातील अनेक अधिकारी,कर्मचारी नोकरीसाठी तसेच सर्वसामान्य नागरिक आपल्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांना थेट मंत्रालयात सोडणारी कोणतीही दळणवळण सेवा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. एसटीने सुरू केलेल्या या सेवेमुळे मंत्रालय,विधिमंडळ,उच्च न्यायालयात व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे.



असे असेल वेळापत्रक



  • सोमवारी / स्वारगेट - मंत्रालय / सकाळी ६ वाजता

  • शुक्रवारी / मंत्रालय - स्वारगेट / सायंकाळी ६.३० वाजता

  • महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात ५० % सवलत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० % सवलत आहे.


किती आहे तिकीट



  • फुल - ५६५

  • हाफ - २९५

Comments
Add Comment

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर