द्रुतगती मार्गालगत अनधिकृत होर्डिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा

  62

विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सी चालकांमध्ये घबराट


नवी मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अनधिकृतरीत्या आणि बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने देखील आपल्या हद्दीतील होर्डिंग काढून टाकण्याची तसेच बेकायदेशीररीत्या विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने सायन-पनवेल महामार्गालगत वाशी गाव येथे विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सी चालकांचे धाबे दणाणले आहेत.


मुंबईमध्ये १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पेट्रोल पंपावर असलेले भलेमोठे होर्डिंगग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७४ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर अनधिकृतपणे तसेच विनापरवानगी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकाने आपल्या हद्दीत अनधिकृतरीत्या आणि विनापरवानगी उभारण्यात आलेल्या सर्व होर्डिंगची झाडाझडती सुरू केली आहे. वाशी विभागाच्या हद्दीत सायन-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी गांव येथे घर क्र. ३ ते १५ आणि १५ ते १७ तसेच १८ ते २० या घरांवर बेकायदेशीररीत्या विनापरवानगी भले मोठे होर्डिंग उभारण्यात आल्याचे वाशी विभाग कार्यालयाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे वाशी विभाग कार्यालयाने सदरचे होर्डिंग उभारणाऱ्या मे. तिरुपती अ‍ॅडव्हर्टायझिंगचे चालक-मालक बिपीन मेहता यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विनापरवानगी जाहिरातबाजी करून शहर विद्रुप करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या होर्डिंगवर कारवाई


सायन-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी गाव येथे विनापरवानगी उभारण्यात आलेले जाहिरातीचे होर्डिंग (बिल बोर्ड) वाहतुकीस अडथळे निर्माण करत असल्याने, वाहन चालकांचे लक्ष विचलित करत होते. सदरचे होर्डिंग अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे आणि शहर विद्रुपीकरणास देखील हातभार लावत असल्याने सदर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याबाबत 'सार्वजनिक बांधकाम विभाग'ने नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचित केले होते.


शासन नियमानुसार नागरी आणि औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या मध्यापासून ६० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून १५ मीटर यापैकी जास्त असेल, अशा अंतरावर होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. मात्र नवी मुंबई महापालिका हद्दीत सायन-पनवेल मार्गालगत उभारण्यात आलेले अनेक होर्डिंग रस्त्याला खेटून तसेच रस्त्यालगत असलेल्या इमारतींवर बिनदिक्कतपणे अनधिकृतरीत्या उभारण्यात आल्याचे दिसून आले आहे. मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, कलम-३ अन्वये नियमबाह्य आहे. सदर कलमान्वये द्रुतगती मार्गाची हद्द, इमारत रेषा आणि नियंत्रण रेषेच्या आत कोणतीही कार्यवाही करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र