Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Neeraj Chopra:ऑलिम्पिकआधी नीरज चोप्राने दाखवला जबरदस्त फॉर्म, जिंकले गोल्ड मेडल

Neeraj Chopra:ऑलिम्पिकआधी नीरज चोप्राने दाखवला जबरदस्त फॉर्म, जिंकले गोल्ड मेडल

मुंबई: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकआधी जबरदस्त फॉर्मातील नमुना सादर केला. स्टार भालाफेकपटूने पावो नूरमी गेम्समध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर केले. फिनलँडमध्ये तुर्कूमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर भाला दूर फेकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. नीरजने दाखवून दिले की ऑलिम्पिकआधी त्याच्याकडे चांगला फॉर्म आहे.


स्पर्धेत फिनलँडचा टोनी केरेनन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ८४.१९ मीटरचा थ्रो करत रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. तर फिनलँडच्याच ओलिव्हर हॅलेंडरने ८३.९६ मीटरचा थ्रो करत तिसरे स्थान मिळवले.


नीरजने चांगली सुरूवात केल्यानंतर तो मागे गेला. त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६२ मीटर भाला फेकला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला ८३.४५ मीटरचा थ्रो फेकता आला. ऑलिव्हरने दुसऱ्या प्रयत्नात ८३.९६ मीटरचा थ्रो केला होता. नीरजने तिसरा प्रयत्न चांगला केला आणि तो पुढे गेला.


 


नीरजचे सहा थ्रो


पहिला थ्रो - ८३.६२ मीटर
दुसरा थ्रो - ८३.४५ मीटर
तिसरा थ्रो - ८५.९७ मीटर
चौथा थ्रो - ८२.२१ मीटर
पाचवा थ्रो - फाऊल
सहावा थ्रो - ८२.९७ मीटर


Comments
Add Comment