बंद पाकीटातील पदार्थ खाण्यापूर्वी जाणून घ्या Expiry Date, Best before

मुंबई: बाजारातून जेव्हा तुम्ही पाकिटातील काही गोष्टी जसे औषधे, बिस्कीट, दूध, दही अथवा ब्युटी उत्पादने घेता तेव्हा त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तर काही पाकिटांवर बेस्ट बिफोर लिहिलेले असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे.


खरंतर अनेकांना एक्सपायरी डेटबद्दल माहीत आहे. मात्र बेस्ट बिफोर आणि यूज बाय डेटबद्दल साऱ्यांनाच माहिती नसते. अनेकजण या दोन गोष्टींचा अर्थही एक्सपायरी डेटसारखाच समजतात. मात्र असे नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगवेगळा आहे.



एक्सपायरी डेट म्हणजे काय?


एक्सपायरी डेट याचा अर्थ एखाद्या उत्पादनाची ती तारीख ज्यानंतर तिचा वापर केला जाऊ शकत नाही. जर खाण्याच्या गोष्टीवर २० जून अशी एक्सपायरी लिहिली असेल तर २० जूननंतर तुम्ही ते खाऊ शकत नाही. एक्सपायरी डेटनंतर जर तुम्ही ते वापरत आहात तर आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. एक्सपायरी डेटनंतर तर औषधे चुकूनही वापरू नयेत.



Best before आणि Used by


बेस्ट बिफोर आणि यूज बाय हे अधिकतर खाण्याच्या गोष्टींवर लिहिलेले असते. बेस्ट बिफोर एखाद्या गोष्टीचे क्वालिटी इंडिकेटर असते. म्हणजेच जर तुम्ही एखादी गोष्ट बेस्ट बिफोर डेटनंतर खात आहात तर त्यात तुम्हाला स्वाद आणि पोषकतत्वे मिळणार नाही. तसेच यूज बाय डेट. हे त्या गोष्टींवर लिहिलेले असते जे काही दिवसांत खराब होतात. जसे, दूध, दही, ब्रेडच्या पाकिटांवर यूज बाय डेट पाहायला मिळते. जर एखादे उत्पादन आज बनले आहे तर ते पुढील ४ दिवसापर्यंत वापरता येऊ शकते यासाठी यूज बायचा वापर करतात.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे