मुंबई: आता टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) संपलेला नाही मात्र भारताने जर ट्रॉफी जिंकली तर त्यांचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर असेल. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ टी-२० सामने खेळवले जातील. आता एका मीडिया रिपोर्टनुसार झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, लवकरच भारताला नवा प्रशिक्षक मिळमार आहे. अशातच मुख्य निवडप्रमुख अजित आगरकर या प्रकरणात कोचचा सल्लाही घेतील. असे सांगितले जात आहे की झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला नवी सुरूवात दिली जाऊ शकते. आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना १५ सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. दरम्यान, या विषयावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. जर नव्या कोचच्या निवड प्रक्रियेत थोडाही उशीर झाला तर पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली जाऊ शकते.
वरिष्ठ खेळाडूंना आराम
टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माशिवाय विराट कोहलीलाही आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. अशातच मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल असा सवाल आहे. ऋतुराजकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.