पुणे : मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल, कुडे वाडा जवळ मुंबई पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने आलेला कंटेनर सर्व्हिस रस्त्याकडे घुसला आणि त्याठिकाणी उभी असलेली महीला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर तीन विद्यार्थी जखमी झाली.
लता रणजित जाधव (वय ४१, रा. कुडे वाडा वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून संदीप झालटे (वय ४०, रा.दिग्विजय कॉलनी, वडगाव), सृष्टी भाटेकर (वय ११, रा.केशवनगर, वडगाव), मैत्रीय भवार (वय १४), मृणाल भवार (वय १४, दोघे रा.दिग्विजय कॉलनी) हे चार जण जखमी झाले आहेत.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडेवाडा बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते. सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी महामार्गाच्या कडेला एक शाळेची बस उभी होती, दरम्यान मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर (एम एच ४६ बी एफ ९१५७) हा पुढे उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याकडे वळला व त्याठिकाणी असलेल्या चारचाकी कार, दोन दुचाकी यांना धडकून एका दुकानात घुसला.
दरम्यान या अपघातात सर्व्हिस रस्त्यावर उभी असलेली महीला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली, तर शाळकरी मुले जखमी झाली आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर उचलून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…