मुंबई: ट्रेकिंग एक मजेशीर आणि चांगला अनुभव आहे. मात्र पहिल्यांदा ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. या टिप्स तुमचा प्रवास अधिक सेफ आणि आनंददायक बनवू शकतात.
ट्रेकिंगची सुरूवात सकाळी लवकर करा. यामुळे दिवसा तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. तसेच रस्ताही नीट दिसेल. जर हवामान खराब असेल तर ट्रेकिंग करू नका.
ट्रेकिंगला जाण्याआधी नीट तयारी करा. आपल्या फिटनेस स्तरानुसार ट्रॅक निवडा. सुरूवातीला लहान आणि सोपे ट्रॅक निवडा. यामुळे जास्त त्रास होणार नाही.
ट्रेकिंगसाठी मजबूत आणि आरामशीर शूज निवडा. एक चांगली बॅग घ्या. ज्यात तुम्ही गरजेचे सामान भरू शकाल. हलके आणि आरामशीर कपडे घाला जे हवामानासोबत अनुकूल असतील.
ट्रेकिंगदरम्यान पुरेसे पाणी प्या. हलके तसेच पौष्टिक जेवण घ्या. जसे फळे, नट्स, एनर्जी बार्स. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल तसेच थकवा वाटणार नाही.
आपला ट्रेकिंग रूट नेहमी व्यवस्थित जाणून घ्या. आपल्या कुटुंबाला तसेच मित्रांना ट्रेकिंग प्लानबद्दल सांगा. ग्रुपमध्ये ट्रेकिंग करणे नेहमी सुरक्षित असते.
ट्रेकिंग करताना छोटी मेडिकल किट जरूर बाळगा. यात बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, पेनकिलर आणि इतर गरजेची औषधे ठेवा.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…