१२ कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला

  71

अररिया : बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अररियामध्ये घडली आहे. कोसळलेला पूल बनवण्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे. १२ कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला, त्यामुळे पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बिहारच्या अररियामधील या पूल दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


पूल कोसळल्यानंतर एसपी सिंगला कंपनीत गार्ड म्हणून काम करणारा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांकडून शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सिकटी प्रखंड येथे पूल दुर्घटना घडली आहे. कोट्यवधी खर्च करुन बकरा नदीच्या पडरिया घाटावरील निर्माणाधीन पूल अचानक कोसळला. पूल एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून नदीत सामावून गेला. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. पूल दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी